पुण्यात 5वाजता ४५% मतदान; पुण्यात काटे की टक्कर आणि धक्कादायक संकेत

0

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या लढती पश्चिम महाराष्ट्रात सुरू असल्यामुळे तिसऱ्या टप्प्याप्रमाणे चौथ्या टप्प्यातही चुरशीच्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढताना पाहण्यास मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात मात्र पुणे शिरूर आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांमध्ये काहीसा निरुत्साह असल्याचे चित्र जाणवत आहे सकाळी सुरुवातीला सर्वच मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा होत्या परंतु अचानक त्यामध्ये घट झाल्याने या तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी धक्कादायकपणे घडताना दिसत आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

पुणे लोकसभेचा विचार करता या लोकसभे अंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कोथरूड आणि कसबा या दोन स्थानिक उमेदवारांच्या मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी जास्त असली तरी वडगाव शेरी आणि शिवाजीनगर या भागामध्ये मतदानाच्या टक्क्यात घट होण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभेत 3 वाजेपर्यंत झालेलं एकूण 35.07% मतदान झाले असून कसबा पेठ 35.23% तर कोथरूड 37.02% या बालेकिल्ल्यात मतांच्या टक्केवारीची रेस चालू आहे परंतु मतदारांचा हक्क होऊन कोणाच्या बाजूने जाणार हाच खरा चर्चेचा विषय आहे. त्याबरोबरच पर्वती 38.01% अन् पुणे कॅन्टोन्मेंट 31.01% मतदान झाले आहे त्यामुळे काटे की टक्कर अशी लढत पुण्यात रंगत असल्याची चर्चा सुरू आहे. पण अपेक्षेप्रमाणे शिवाजीनगर 26.61% अन् वडगाव शेरी 29.27 अत्यल्प मिळणारा प्रतिसाद हा कोणाला धोक्याचा आहे याची सध्या पुणे शहरात चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पुणे लोकसभेत 5 वाजेपर्यंत झालेलं एकूण 45% मतदान झालं आहे. दुपारी 3ची परिस्थिती 5 वाजता ही तशीच राहिली. निवडणूक आयोगाने संध्याकाळी ५वाजता जाहीर केलेली आकडेवारी:-

208- वडगाव शेरी 467669 40.5%

209-  शिवाजीनगर 278530 38.73%

210-  कोथरूड 414755 48.91%

212-  पर्वती 341055 46.8%

214- पुणे कॅन्टोन्मेंट 282270 44.01%

215-  कसबा पेठ 276997 51.07%

चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघ 3 वाजता टक्केवारी:-

नंदुरबार –  ४९.९१ टक्के

जळगाव –   ४२.१५ टक्के

रावेर –  ४५.२६ टक्के

जालना – ४७.५१  टक्के

औरंगाबाद  – ४३.७६  टक्के

मावळ – ३६.५४ टक्के

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पुणे – ३५.६१ टक्के

शिरूर –   ३६.४३ टक्के

अहमदनगर-  ४१.३५ टक्के

शिर्डी – ४४.८७ टक्के

बीड –  ४६.४९ टक्के