शरद पवारांचा पडद्यामागे भाजपच्या बड्या नेत्याशी संपर्क सुरुच; निवडणुकीत वेगळे अर्थ निघतात या नेत्यांचा आरोप

0

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी भाजपचे नेते राजनाथ सिंह यांना फोन केला होता, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आजारी असताना आणि निवडणुकीच्या काळात कोणी असा एकमेकांना फोन करतं का? असा सवाल करतानाच राजनाथ सिंह यांच्याशी काय चर्चा झाली? ही चर्चा शरद पवार यांनी सार्वजनिक करावी, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर यांच्या या धक्कादायक गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांना फोन केला होता. राजनाथ सिंह यांच्यासोबत शरद पवार यांचे काय बोलणे झाले आहे हे आम्ही विचारू इच्छितो. राष्ट्रवादीच्या 5 जागांसंदर्भात चर्चा झालीय का? किंवा एकनाथ शिंदे मुंबईच्या तीन जागा लढत आहेत, त्यासंदर्भात चर्चा झालीय का? किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चर्चा झालीय का?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तब्येत बिघडल्यावर कोणी फोन करत नाही

ऐन निवडणुकीत कोणाची तब्येत बिघडली तरी कॉल करत नाही. पण शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना कॉल का केला? याचा खुलासा करावा. ऐन निवडणुकीत फोन का करण्यात आला? याचा खुलासा केला पाहिजे. उत्तरं देताना कोणतीही बालबोध उत्तर देऊ नका, खरं कारण काय हे त्यानी सांगावं. आम्हाला ज्या शंका आहेत त्या आम्ही सांगितल्या. कॉल केला की नाही त्यांनी सांगावं. पुढे आम्ही काय ते बोलू, असं आंबेडकर म्हणाले. निवडणुकीत असे फोन केले जात नाही. त्याचे वेगळे अर्थ निघतात. त्यामुळे शरद पवार यांनी खुलासा करावा. मुंबईत एकनाथ शिंदे यांना मदत करण्यासाठी फोन केला का?, असा सवालही त्यांनी केला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सुप्रिया सुळेंसाठी काम केलं

आम्ही बारामतीमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार आम्ही त्यांच्या पाठी उभे राहिलो. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विजयासाठी काम करायला सांगितले होते, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.