अंगणवाडी सेविका प्रिया गाडे यांनी दिला बेवारस मनोरुग्णाला आधार

0

चेंबूर दि. ४ (अधिराज्य) लल्लूभाई हिरानंदानी २५-ए, मानखुर्द येथील अंगणवाडीत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रिया प्रकाश गाडे या दि. २ मे २०२४ रोजी अंगणवाडी मध्ये जात असता रस्त्यावर एक दुखापतग्रस्त बेवारस मनोरुग्ण त्यांच्या दृष्टीक्षेपात पडला, सदर मनोरुग्ण नग्नावस्थेत असल्याने येणारी जाणारी लोक मदत करण्याऐवजी रस्त्या बदलून जात होती.

सदर पीडिताच्या पायास गंभीर दुखापत झाल्याने त्यास चालता येत नव्हते त्यावेळी प्रिया गाडे यांनी प्रसंगावधानता दाखवत क्षणाचा ही विलंब न लावता समाजभूषण पुरस्कार प्राप्त भगवान साळवी यांना फोन करून सदर प्रसंग सांगितला भगवान साळवी यांनी ही प्रसंग व वेळेचे महत्व लक्षात घेता तातडीने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून प्रिया गाडे यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी जाण्यास सांगितले; त्यावेळी समाजसेवक नितीन बनसोडे, पोलीस हवालदार शहाजी चाचर (HC01835) व ललिता म्हात्रे (WAPCO091910) मदतीस धावून आले व सदर रुग्णास राजावाडी रुग्णालयात हलवून त्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले, पायाची ड्रेसिंग व एक्सरे काढून इतर वैद्यकीय तपासण्या व उपचार करण्यात आले, सर्व इलाज झाल्यावर सदर रुग्णास पोलिसांच्या मदतीने माहुल गाव, चेंबूर येथील मुंबई महानगर पालिका अंतर्गत येणाऱ्या ग्रेस फाउंडेशन मध्ये एडमिशन करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अंगणवाडी सेविका प्रिया प्रकाश गाडे यांनी बेवारस दुखापतग्रस्त मनोरुग्णास वेळीच योग्य मदत करून त्यास आधार दिल्याबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे, प्रिया गाडे यांनी हे सदर कार्य केवळ माझ्या एकट्यामुळे न होता त्यात समाजसेवक भगवान साळवी, लल्लूभाई पोलीस स्टेशन मानखुर्द, ग्रेस फाउंडेशन या सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे घडले आहे असे प्रतिपादन केले.