पुणे : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व शेतकरी आणि सैनिक चळवळीसाठी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा घेऊन तळागाळात नागरीकांना त्यांचे मूलभूत हक्क अधिकार आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी मी लोकसभेची निवडणूक लढवित आहे. ज्या भूमीत जिजाऊंच्या पदस्पर्शाने सोन्याचा नांगर फिरवून शिवाजी महाराजांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माणाची बीजे पेरली आणि आदर्श असे जगाला हेवा वाटणारी हिंदवी स्वराज्य उभा केले. त्याच प्रेरणेतून आणि विचारधारेमधून आधुनिक पुणे घडवायचे आहे. पुणेकरांचा स्वाभिमान आणि नावलौकिकास तडा जाईल असे एकही काम माझ्या हातून घडले नाही. आजवर पर्यावरण, मृदूसंवर्धन, सामाजिक ऐक्य आणि आजी-माजी सैनिकांना हक्काधिकारासाठी पुढाकार अश्या नैतिकतेच्या जोरावर लोकसभेच्या निवडणूकीचा प्रचार शुभारंभ करत असल्याचे मत सैनिक समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश पाटील यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.






पुणे शहरातील लाल महाल येथे सैनिक समाज पक्षाचे उमेदवार कर्नल सुरेश पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत प्रचार शुभारंभ केला.











