देशामध्ये मागील दहा वर्षांमध्ये एक शांतीमध्ये आधुनिक क्रांती झाली असून देशातील सुमारे 25 कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढलं असून 10 वर्षांमध्ये 20 कोटी पक्क घरे, 50 कोटी घरी गॅस दिला, 55 कोटी लोकांना शौचालय, 60 कोटी लोकांना नळ्याने पाणी, महाराष्ट्रातील 7 कोटी लोकांना मोदीजींच्या योजनेतून मोफत रेशन मिळतं आहे. आज मोदीजींच्या रूपाने ज्याला सामान्य माणसाची दुःख समजतात असा नेता मिळालाय असे आव्हान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वारजे येथील सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेमध्ये व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावरती आमदार भीमराव तापकीर, माणिकराव कोकाटे, राहुल कुल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह वारजे भागातील स्थानिक नेते दिलीप बराटे, बाबा धुमाळ, किरण बारटक्के सचिन दांगट कैलास दांगट यांच्यासह महायुतीचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
दहा वर्षांमध्ये भारतामध्ये एक अशी क्रांती झाली भारत कसा बदलला हे कोणालाच कळलं नाही. भारत आज जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जगातल्या पुढारलेल्या देशांची अर्थव्यवस्था मजबूत आहे म्हणून ते जगावर राज्य करतात आणि भारताची अर्थव्यवस्था पुढच्या पाच वर्षांमध्ये जगातली तिसरी अर्थव्यवस्था झाल्यानंतर या भारताकडे देखील कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही असा एक मजबूत भारत आज मोदीजींच्या नेतृत्वात तयार होतो आहे. 2019 नंतर एक तरी बॉम्बस्फोट पाकिस्तान करू शकलं का? आत्ता भारत कुठल्या कुठे गेला पाकिस्तानच्या हातात कठोर आला पाकिस्तान भीक मागतोय अशी अवस्था पाकिस्तानची झाली. विरोधी पक्षनेते उज्वल निकम यांच्यावर टीका करतात यांनी कसाबची बदनामी केली त्यामुळे लक्षात ठेवा ही साधी निवडणूक नाही आहे देश कोणाच्या हातात त्याचा फैसला करायचा 7 तारखेला मतदान करताना तुमचा आशीर्वाद थेट मोदीजींना मिळेल आणि पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होते आणि समर्थपणे हा देश पुढे नेण्याचं काम करतील म्हणून तुमचा आशीर्वाद द्या असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी वारजातून पारंपारिक मतदारांना केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक नगरसेवक ज्येष्ठ नेते दिलीप बराटे, बाबा धुमाळ, सचिन दांगट,किरण बारटक्के यांनी अनेक वर्ष रखडलेल्या प्रश्नांवरती स्थानिक विषयावरती चर्चा करून स्वघोषित नेता (महापालिकेचे आरक्षणे पिलावळीसाठी ताब्यात ठेवणारे) समजणाऱ्या स्थानिक नगरसेवकाला चिमटे काढले. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनीही सुप्रिया सुळे यांच्यावरती हल्ला करण्याचे काम केले परंतु सुनेत्रा वहिनी यांच्या आवाहनात्मक भाषणानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विस्तृत आव्हानानंतर सभेचा नूरच बदलला आरोप प्रत्यारापाची सभा अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राष्ट्रीय पातळीवर गेली आणि सभेला जमलेल्या प्रत्येक पारंपारिक मतदाराला या भाजप विचारसरणीच्या बरोबर झालेल्या बदलाचा स्वीकार करावा अशी भावना निर्माण झाली.