इंदापूरच्या आजी-माजी आमदारांची अजित पवारांकडे एकच मागणी; म्हणाले, दादा आम्हाला फक्त…

0
2

देशाचं लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात घडामोडींना वेग आला आहे. मतदानाला अवघे पाच दिवस राहिलेले असताना प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या इंदापूर तालुक्यात सभा होत आहेत. अजित पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार इंदापूर तालुक्यात आज सभा घेत आहेत. इंदापूर तालुक्यात अजित पवार यांच्या तीन सभा होणार आहेत. इंदापूरच्या सणसर, शेळगाव आणि निमगाव केतकीमध्ये अजित पवारांनी सभा होणार आहे. सणसरमध्ये त्यांची पहिली सभा पार पाडली.

आजी-माजी आमदारांची मागणी काय?

अजित पवारांच्या इंदापूर दौऱ्यादरम्यान इंदापूरच्या आजी-माजी आमदारांनी अजित पवार यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. इंदापूर तालुक्याला पाणी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

गेल्या काही दिवसांपासून आपले दिवस चांगले सुरू आहेत. इंदापूरला आता पाण्याची समस्या सतावत आहे. दादांना एकच विनंती आहे की आम्हाला पाणी द्या…फडणवीस साहेबांना देखील एकच विनंती की नीरा देवधरचं पाणी द्या. अन्यथा आमचा शेतकरी अडचणीत येईल. आमच्या शेतकऱ्यांची शेती उध्वस्त होईल, अशी मागणी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील आणि द्याव्या ही लागतील. बारामतीपेक्षा इंदापूरचे मताधिक्य असले पाहिजे. परमेश्वराने आपल्याला डोळे, बुद्धी, डोके दिले आहे विचार करा. आपला खासदार सत्तेच्या प्रवाहात नव्हता म्हणून निधी मिळाला नाही. विधानसभेला जागा कुणाला सुटणार आहे का प्रश्न गौण आहे. एकत्र बसून निधी आणावा लागणार आहे. पाणी आणायला भक्कम नेतृत्व लागणार आहे. इंदापूर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. हा पाणीप्रश्न सुटला पाहिजे, असं इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय