भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने कोथरूड भिम महोत्सव समितीच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेते श्री किशोर कदम उर्फ सौमित्र आणि शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते विद्रोही शाहीर संभाजी भगत यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भिमरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पुणे महापालिकेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री.राम सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार श्री जितेंद्र मैड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अण्णा ओव्हाळ यांना मरणोत्तर तर , क्रीडा क्षेत्रातील श्री. अनिल दरेकर, गोरगरिबांसाठी रात्र प्रशाला चालवणारे श्री आरुष चव्हाण, युवा सरपंच मयूर भांडे यांना भिमरत्न तर माता रमाई माता भिमाई माता सावित्री पुरस्काराच्या मानकरी नीलिमाताई पंडित (बर्वे), डॉक्टर रेणुकाताई गोंदकर, अनुराधाताई एडके यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी कोथरूड मतदार संघातील सर्वात्कृष्ट बुद्ध विहार म्हणून तक्षशिला बुद्धविहार तर सर्वातकृष्ट आश्वासक तरुणाई म्हणून मिलिंद संघ आणि सर्वात उत्कृष्ट सामाजिक संघटन म्हणून जय जवान तरुण मंडळ यांना पुरस्कार देऊन समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कोथरूड मे महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू डाकले, मा. महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे,मा. नगरसेवक पृथ्वीराज सुतार, मा. नगरसेविका अश्विनी जाधव, मा. नगरसेवक वसंत मोरे, मा. नगरसेवक तानाजी निम्हण, पतित पावन संघटनेचे प्रमुख श्री शिवाजीराव चव्हाण ,श्री श्रीकांत शिळमकर भाजपाचे श्री संदीप बुटाला, विजय खळदकर, जयदिप पडवळ, मा जयंत भावे, मंदार जोशी, संदिप मोकाटे, कामगार नेते अशोक खांडेकर, सौ दिपाली डोख, अजय भुवड,नितिन शिंदे, अनिरुद्ध खांडेकर, चेतन भालेकर, वर्वे, अमोल साबळे, माऊली मेहेत्रे पप्पु टेमघरे, संतोष शेंडगे, शरद देशमुख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण समारंभा नंतर अभिनेते किशोर कदम उर्फ कवी सौमित्र यांनी त्यांच्या काही गाजलेल्या कविता सादर केल्या आणि त्या नंतर विद्रोही शाहीर संभाजी भगत यांचा “विद्रोही शाहिरी जलसा ” हा कार्यक्रम पार पडला.
कोथरूड भीम महोत्सव समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कोथरूड मतदार संघातील भीमसैनिक आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या मानवतावादी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे कार्याध्यक्ष श्री बाळासाहेब खंकाळ, नामदेव ओव्हाळ, दीपक कांबळे, वसंतराव ओव्हाळ ,उमेश कांबळे , नागेश गायकवाड, सुरेंद्र सावंत, अमोल जगताप, सौ लक्ष्मी कांबळे, राहुल जगताप, राजाभाऊ गायकवाड, राजेश कांबळे, विजय मोघे , संतोष शेडगे, नारायण दुर्गे, सचिन डाकले,दत्ता कांबळे, भारत भोसले, नागेश गायकवाड , गणेश कदम , अशोक कारंजकर, जितेश दामोदर्रे, विजय बागडे, मिलिंद कदम, सुरेंद्र शिंदे, योगेश खरात , सौ. लक्ष्मी कांबळे आदी प्रमुखांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वडवेराव यांनी केले.