‘मुंबईचं मराठीपण टिकवण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची मोठी भूमिका’, अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य

0

“काही लोकांना फोडण्याचा राजकारण झालं. अशा पद्धतीचा राजकारण करून उद्याच्या काळामध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे योग्य पद्धतीने राहणार आहे का?कायदा काय राहणार? याचाही विचार तुम्ही मी सगळ्यांनी केला पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

“आपल्या इथं हे सरकार आल्यापासून सांगितलं, कोणत्याही निवडणुकांमध्ये, विधान परिषदेची असेल विधानसभेचे असतील पोट निवडणूक असेल, आता काल झालेल्या मार्केट कमिटीच्या निवडणुका असतील बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारचे यश मिळवलं आहे. जनता आपल्याबरोबर आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला नाकारता येणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

“माझी आपल्याला विनंती आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस सोनिया गांधींनी, शरद पवारांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं होतं, अडचणी अधिक होत्या. तरुणाचं संकट होतं. परंतु त्याच्यावर मात करून आम्ही सगळ्यांनी हे महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम केलं”, असा दावा अजित पवार यांनी केला.

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले?

महाराष्ट्रामध्ये आज अवकाळी पाऊस पडतोय. त्याचा उल्लेख अशोक चव्हाण यांनी केला. माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे. त्याच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या फळबागा, त्याची उन्हाळी पिक उध्वस्त झालेली आहेत. परंतु त्यांना मदत करण्याची भूमिका हे आताच्या राज्यकर्त्यांची नाही. काय करतात त्यांचं काम नाही का?

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

हे सरकार काही बोलायला तयार नाहीये आणि म्हणून मित्रांनो एवढ्यावरच नाही तर अजूनही एक ते पाच तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे तरी मुंबईतली सभा असली तरी तुमच्या माझ्या महाराष्ट्रातला बळीराजा तुमच्या माझी सगळ्यांची सेवा करतोय. त्याला आधार देण्याचं काम देखील आपल्याला करावंच लागणार आहे.

सरकारला दहा महिने झाले. सरकार निवडणुकांना का घाबरतं? महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घेत नाहीत. तुम्ही निवडणुका जाहीर का करत नाहीये? आता तर पावसाळा पण नाहीये. परंतु निव्वळ यांच्या मनामध्ये भीती आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता काय करेल याच्याबद्दलचा विश्वास शिंदे-फडणवीस सरकारला नाहीये. आज मुंबईसारखं एक महत्त्वाचे शहर काही राज्यांच्या पेक्षा या शहराचं बजेट जास्त आहे, असं असताना देखील तिचा कारभार राज्याच्या प्रमुखांच्या अंडर चाललेला आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?