तारक मेहता का उल्टा चष्मा फेम सोनूच्या आरोपांवर आसित मोदींनी अखेर मौन सोडलं; मी तिला माझ्या मुलीप्रमाणे वागवलं पण…,

0

तारक मेहता का उल्टा चष्मा अनेक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. पण मागच्या काही काळापासून हा कार्यक्रम बराच वादात आहे. अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आणि मालिकाच्या निर्मात्यांवर कलाकारांनी आरोप केल्याचं पाहायला मिळालं. या मालिकेचे निर्माते आसित मोदी आहे. या मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीने काही दिवसांपूर्वी निर्मत्यांवर छळ केल्याचा आरोप केला होता. त्यावर आता आसित मोदींची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पलकने केले होते निर्मात्यांवर आरोप

पलकने ही मालिका सोडली आहे. पण मालिका सोडल्यानंतर तिने निर्मात्यांवर मानिसक छळाचा आरोप केला होता. तसेच त्याचा तिच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला आणि त्याच कारणामुळे तिने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं होतं. पलक म्हणाली होती की,त्याने मला धमकी दिली होती. मी ज्या ब्रँडसोबत काम केले त्यांची नावे शेअर करावीत अशी मागणी त्यांनी केली. हे ऐकून मला धक्काच बसला. मला तेव्हा मालिका सोडायची होती, त्याचसाठी हे सगळं करण्यात आलं होतं.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

आसित मोदींनी दिली प्रतिक्रिया

यावर आता आसित मोदींची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ETimes शी बोलताना त्यांनी म्हटलं की, मला खूप वाईट वाटलं कारण मी तिला माझ्यामुलीप्रमाणे वागवलं होतं. जेव्हा जेव्हा एखादा कलाकार मालिका सोडून जातो तेव्हा मला खूप वाईट वाटतं, कारण तो कुटुंबाचा एक सदस्य झालेला असतो. पण मी कोणाविषयीच मनात काहीही ठेवत नाही. कारण माझा हेतू हा एखादा कॉमेडी शो बनवणं हा आहे. तसेच कलाकारांच्या मानधानावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी म्हटलं की, कुणाचेही पैसे थकवले नाहीत. तसेच जेव्हा जेव्हा ज्यांना सुट्टी हवी होती, तेव्हा तेव्हा त्यांना सुट्टी दिलीये.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत