भाजपचे मोठे यश? 8 उमेदवारांची माघार;मतदानापूर्वीच बिनविरोध निवड; काँग्रेसची मात्र यामुळे झाली नामुष्की

0

सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना मतदानापूर्वीच बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे आज आठही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. सुरत लोकसभा जागेबाबत गेल्या दोन-तीन दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता, जो आज संपला आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या फॉर्मवर भाजपकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि त्यासंदर्भात काल म्हणजेच रविवारी सुनावणी होऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज अवैध आणि रद्द ठरवण्यात आला आहे.

आज म्हणजेच सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान बसपचे उमेदवार प्यारेलाल यांनी आपला फॉर्म मागे घेतला तर या जागेवर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी घोषित झाले आहेत. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. या जागेवर एकूण 10 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते, त्यानंतर काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला असून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात एकूण आठ उमेदवार होते. आता त्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या स्थितीत भाजप उमेदवाराचा विजय निश्चित आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा