‘द केरळ स्टोरी’फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; ट्वीट करत दिली हेल्थ अपडेट

0

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेता सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. दरम्यान त्यांचा अपघात झाला.

अदा शर्माने दिली हेल्थ अपडेट
अदा शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. तिने ट्वीट करत लिहिलं आहे,”मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद”.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

सुदिप्तो सेन यांनी दिली अपघाताची माहिती
‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी ट्वीट करत अपघाताबद्दल माहिती दिली होती. त्यांनी ट्वीट केलं होतं,”आज आम्ही करीमनगरातील एका मेळाव्यात आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जात होतो. पण, दुर्दैवाने अपघातामुळे आम्हाला पुढचा प्रवास करता आला नाही. करीमनगरच्या जनतेची मी मनापासून माफी मागतो. आमच्या मुलींना वाचवण्यासाठी आम्ही सिनेमा बनवला आहे. कृपया आम्हाला पाठिंबा देत राहा”.

‘द केरळ स्टोरी’ने 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील!
अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा शनिवारी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 2023 मधील हा चौथा चित्रपट आहे, ज्याने 100 कोटींचा आकडा गाठला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल शाह यांनी निर्मिती केली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार