अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ गेममुळे जीवन संपवल्याची शंका

0
2

: अमेरिकेत शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी जंगलात आढळून आला होता. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून, त्यामागचं कारण ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ ही गेम असल्याचा दावा आता रिपोर्टमध्ये केला जात आहे. आतापर्यंत कित्येक लहान आणि किशोरवयीन मुलांनी या गेममुळे आपला जीव गमावला आहे. यामुळेच याला ‘सुसाईड गेम’ देखील म्हटलं जातं.

८ मार्च रोजी अमेरिकेतील मॅसाचुसेट्स विद्यापीठात पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह मिळाला होता. लुटमार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र आता या घटनेचा तपास आत्महत्येच्या अँगलने केला जात असल्याची माहिती ब्रिस्टल काउंटी डिस्ट्रिक्ट एटर्नीचे प्रवक्ते ग्रेग मिलियोट यांनी दिली. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिली नसली, तरी या आत्महत्येशी ब्लू व्हेल चॅलेंज या गेमचा संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. ही एक ऑनलाईन गेम असून, खेळणाऱ्या व्यक्तीला यात काही गोष्टी करण्याचं चॅलेंज दिलं जातं. या गेममध्ये 50 लेव्हल आहेत, ज्या टप्प्या-टप्प्याने अधिक अवघड होत जातात.

या गेममधील सुरुवातीचे चॅलेंज किंवा टास्क अगदी सोपे असतात, मात्र नंतर नंतरच्या लेव्हलमध्ये खेळणाऱ्याला इजा पोहोचवतील असे चॅलेंज दिले जातात. या गेमला बॅन करण्याचा विचार भारत सरकारने केला होता. मात्र नंतर त्यामध्ये मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला. “ब्लू व्हेल गेम ही आत्महत्येस प्रवृत्त करणारी आहे. त्यामुळे यापासून दूर रहा” असं आयटी मंत्रालयाने आपल्या सूचनेत म्हटलं आहे.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!