अमरावती लाेकसभा मतदारसंघात राजकीय घडामाेडींचा वेग वाढू लागला आहे. अनेक वर्षानंतर अखेर अडसूळ आणि राणा या दाेन नेत्यांची आज (बुधवार) अमरावती येथे भेट झाली. राणा दाम्पत्याने अभिजित अडसूळ यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत निवडणुकी विषयी सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अमरावती लाेकसभा मतदारसंघात खासदार नवनीत राणा या महायुतीच्या उमेदवार आहे. या मतदारसंघात आज राणा दाम्पत्य अडसूळ यांच्या भेटीला गेल्या. या दाेघांमधील वाद मिटला की काय असा सवाल आता उपस्थित हाेऊ लागला आहे.






या भेटीनंतर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो अशी सूचक प्रतिक्रिया अभिजित अडसुळ यांनी दिली आहे. अडसुळ म्हणाले अजून आम्ही काहीही निर्णय घेतलेलला नाही. लवकरच आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ.
अडसूळ साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही आलो आहे. आम्ही सर्व एकत्र आहे आणि एकत्र मिळून आम्ही काम करू. जो राम को लाये है हम उनको लायेगे असे म्हणत मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सोबत काम करू अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.
दरम्यान राणा दाम्पत्याने आज भाजप आमदार प्रवीण पोटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची देखील भेट घेतली.











