तेरी भी चुप मेरी भी चुप.. पुणे मनपाच्या ईव्हीएम मॉक पोल मध्ये व्हीव्हीपॅट मध्ये चार चिठ्ठ्या जास्त..? व्हीव्हीपॅट सदोष तर वापर कशासाठी?

0
10

नितीन कदम यांचे खळबळजनक आरोप आरोप

पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीत निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट (VVPAT) वापरणार नसल्याचे जाहीर करत असतानाच पुणे महानगरपालिकेच्या वतीने सावरकर भवन येथे घेतलेल्या ईव्हीएम मॉक पोल मध्ये व्हीव्हीपॅट द्वारे 4 चिठ्ठ्या जास्तीच्या आल्याचा विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नितीन कदम यांनी केला आहे.

महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन एका मशीनवर 51 वेळा मतदान करण्यात आल्या. ईव्हीएम यंत्रांवर मतदान करताना व्हीव्हीपॅट जोडून ही टेस्ट घेण्यात आली. मात्र त्यापैकी 51 मतांची प्रत्यक्ष मोजणी झाली असताना व्हीव्हीपॅटमध्ये 55 चिठ्ठ्या सापडल्या. विशेष म्हणजे या चिठ्ठ्यांमध्ये प्रत्येकी दोन जास्तीची मते क्रमांक 1 व क्रमांक 3 ला पडल्याचे दिसून आले. परंतु वरिष्ठांनी याची वाचता कुठे होऊ नये याची पद्धतशीरपणे काळजी घेतल्याचे दिसून आले.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय जाहीर करणारा आयोग, मग पुणे मनपामध्ये मॉक पोल कशासाठी करतय?
हा सरळसरळ दुटप्पीपणा आहे आणि वरिष्ठ पातळीवरून अशा टेस्टिंगचे आदेश न मिळता महानगरपालिका अधिकारी अशा पद्धतीची चाचणी घेणार नाहीत, हे स्पष्ट असल्याचे नितीन कदम म्हणाले.

एकीकडे आयोग व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचे ठाम सांगतो आणि दुसरीकडे मात्र चाचणीत यंत्र वापरतो, ही बाब संशयास्पद आहे. यामध्ये एक वेगळा राजकीय हेतू असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.

“आमची भूमिका स्पष्ट आहे – ईव्हीएम नको!”
देशपातळीवर सध्या ईव्हीएम विरोधात वातावरण आहे. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत मतदार संख्येच्या वाढीबाबत आरोप होत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत सत्ताधारी काही वेगळे घडवू पाहत असल्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही कदम म्हणाले.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

आमचा स्पष्ट सवाल, जर VVPAT वापरणार नसाल, तर टेस्टिंगमध्ये वापर का? आणि वापर केलाच, तर त्याचे निकाल का जाहीर करत नाही? या संपूर्ण प्रकरणावर मनपा निवडणूक विभागाने खुलासा करावा, अशी मागणी करत नितीन कदम यांनी या विषयावर संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे.

महत्वाचे मुद्दे:

  • 51 मतांच्या चाचणीला 55 व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या!
  • व्हीव्हीपॅट वापरणार नसल्याचं जाहीर करूनही, चाचणीत वापर?
  • क्रमांक 1 व 3 ला सर्वाधिक मते – हेतुपुरस्सर घडवलेली चाचणी?
  • विरोधकांना भ्रमात टाकण्याचे कारस्थान?
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची मागणी – EVM नकोत!
अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली