राजापूरमध्ये काँग्रेसला धक्का; कुणबी समाजाच्या ‘या’ नेत्याची लवकरच भाजपकडे वाटचाल

0
1

राजापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हे पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्षप्रवेश होईल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग आहे. मागच्या काही महिन्यांपासून भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला. त्याशिवाय भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पक्षप्रवेश सुरु आहेत.

दरम्यान, राजापूरमध्ये काँग्रेसचे कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. प्रकाश मांडवकर हे रवींद्र चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

रत्नागिरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये प्रकाश मांडवकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मांडवकरांकडे राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जात आहे. मागच्या ३२ वर्षांपासून ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये काम करत आहेत.

कुणबी समाजाचे दिवंगत नेते भाईसाहेब हातणकर यांचे मांडवकर हे खंदे समर्थक राहिलेले आहेत. याशिवाय त्यांनी काही काळ त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केलेले आहे. त्यानंतर त्यांनी कुणबी समाजासाठी तालुक्यामध्ये मोठं काम उभं केलं. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसणार आहे.