बावनकुळे म्हणतात… 2024 पर्यंत शिंदेच मुख्यमंत्री!, मग अजितदादांचं काय हे ही सांगितलं?

0

महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. दरम्यान, मुंबईत ताकद दाखवण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीनंतर अजित पवार हेच संख्याबळाच्या खेळात पुढे असल्याचे स्पष्ट झाले. शरद पवार यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक आमदारांचा अजितदादांना पाठिंबा आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार याच वर्षी मुख्यमंत्री बनणार असे वक्तव्य केले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार असे सांगितले आहे. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील असे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी म्हटले आहे. राज्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. अजित पवार सत्तेत आल्यामुळे शिंदे गटात कुठलीही नाराजी नाही. अजितदादांनी आज सर्व खुलासे केले आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

बावनकुळे म्हणाले, काही लोक राज्यात केवळ संभ्रम निर्माण करत आहेत. शिंदे मुख्यमंत्री असताना आणखी चर्चा करणे गरजेचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील लोकांनीजो पक्ष सोडला तो त्यांना त्रास झाला म्हणून सोडला. आम्ही कोणताही प्रयोग केला नाही. अजित पवार गटाने आज बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे 53 पैकी 32 आमदार उपस्थित होते, तर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आयोजित केलेल्या बैठकीला 18 आमदार उपस्थित होते, असे पक्षाच्या दोन्ही गटातील सूत्रांनी सांगितले. उर्वरित 3 आमदारांची भूमिका स्पष्ट नाही.