BIG BREAKING भारतीय दूतावासावर दुसरा हल्ला आत घुसून जाळपोळही; अमेरिकेत दूतावासात घुसण्याची हिम्मत कोणाची?

0
6

न्यू यॉर्क : अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ल्याची घटना घडली आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्नुसार, रविवारी सकाळी 1.30 ते 2.30 च्या दरम्यान हा हल्ला झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. मागच्या पाच महिन्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. भारतीय दूतावासाला टार्गेट करण्यात आलं आहे. हल्लेखोरांनी दूतावासामध्ये घुसून जाळपोळ केली.

स्थानिक चॅनल दीया टीव्हीच्या रिपोर्ट्नुसार, संयुक्त राज्य अमेरिकेने या घटनेची निंदा केली आहे. आगीचा भडका वाढण्याआधीच सॅन फ्रान्सिस्को फायर डिपार्टमेंटने आगीवर नियंत्रण मिळवलं. रिपोर्ट्नुसार, आगीच्या घटनेमुळे दूतावासाच फार मोठ नुकसान झालेलं नाही. कुठलाही कर्मचारी जखमी झालेला नाही.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

हल्ला का झाला?

या हल्ल्यामागे कथित खलिस्तानी समर्थक असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा रिलीज केलाय. पण तो व्हिडिओ खरा आहे का? याची पृष्टी अजून झालेली नाही. हरदीप सिंह निज्जरची कॅनडामध्ये गोळी मारुन हत्या करण्यात आली. त्याचा विरोध म्हणून अमेरिकेतील भारतीय दूतावासावर हल्ला केला, असं खलिस्तानी समर्थकांनी या व्हिडिओमध्ये म्हटलय.

अमेरिकेची भूमिका काय?

निज्जरची कॅनडाच्या सरेमध्ये दोन अज्ज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळी मारुन हत्या केली होती. निज्जर सिख फॉर जस्टिसशी संबंधित होता. कॅनडामधील गुरु नानक सिख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को येथे भारतीय वाणिज्य दूतावासावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले. हा परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांविरोधात केलेला गुन्हा आहे, असं त्यांनी म्हटलय.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

सॅन फ्रान्सिस्को दूतावासावर दुसरा हल्ला

याआधी मार्च महिन्यात खलिस्तानी समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. त्यांनी इमारतीच नुकसान केलं होतं. या हल्ल्याचा भारत आणि अमेरिकन सरकारने निषेध केला होता. हल्ल्यात सहभागी असलेल्यांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी केली होती. हल्लेखोर खलिस्तानी समर्थक घोषणाबाजी करत दूतावास परिसरातील बॅरिकेड्स तोडून आत घुसले होते. तिथे दोन खलिस्तानी झेंडे रोवले होते. तात्काळ हे झेंडे तिथून काढण्यात आले.