“मुळ पवार अन् बाहेरून आलेला हा फरक ओळखा”; अजितदादांच्या आवाहनावर शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर

0

भाजपचे खेड तालुका समन्वयक अतुल देशमुख यांनी गुरुवारी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, विकास मुंगसे आदी उपस्थित होते. यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजय यांच्यात लढत होणार. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बारामतीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांनी आपली वेगळी चूल मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. अजित पवार सध्या महायुतीत भाजपसोबत सत्तेत सहभागी आहेत. महायुती बारामतीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अजित पवार यांनी प्रचारसभेत बोलताना बारामतीकरांनी आता सुनेला निवडून द्या, पवार आडनावाच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले होते. यावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नर्मविनोदी शैलीत उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, “अजित पवार हे काहीही चुकीचे बोलले नाहीत. मुळ पवार आणि बाहेरून आलेला, हा फरक ओळखा” अशी कोटी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

पवार म्हणाले, “”माझी, अजितची, सुप्रियाच्या निवडणुकीवेळी आमचे सगळे कुटुंब लोकांमध्ये जात होते. लोकांमध्ये सहभागी होऊन त्यांचे आशीर्वाद घेत होते. आता कुटुंबातील प्रत्येकाचे व्यवसाय, शिक्षण या सगळ्या गोष्टी तुम्हाला व सगळ्या जगाला माहीत आहेत.”

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार म्हणाले की, “तुम्ही इतके दिवस पवार कुटुंबासोबत आहात, पण आता लोकसभा निवडणुकीत एकाच कुटुंबातील दोन उमेदवार असल्यामुळे काय करायचे याचा थोडा विचार केला असेल. कोणाला पाठिंबा द्यायचा, कोणाला मतदान करणं सोपं आहे, याचा विचार तुम्ही करत असाल, कारण तुम्ही इतके दिवस पवारांसोबत आहात, सुनेत्रा पवार यांनाच मतदान करा. लोक कुटुंबाला आधार देण्याची परंपरा खंडित करणार नाहीत.”

अजित पवार पुढे म्हणाले, “1991 च्या लोकसभा निवडणुका लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मुलगा म्हणजे मला निवडले होते. त्यानंतर तुम्ही वडील म्हणजे पवार साहेबांची निवड केली. त्यानंतर तुम्ही मुलीला म्हणजेच सुप्रिया सुळे यांना सलग तीन वेळा मतदान केले. आता तुम्ही जा. आणि तुमच्या सुनेला (सुनेत्रा पवार) मत द्या.”

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन