मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहितची फक्त तीन शब्दांची पोस्ट, हार्दिक पांड्याचा उल्लेख नाही

0
1

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने पराभवाचा दुष्काळ संपवला आहे. IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत केलं. त्याआधी मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या टीमकडून दारुण पराभव झाला होता. मुंबई इंडियन्सचा विजय ही फॅन्ससाठी सुखावणारी बाब आहे. याआधी मुंबई इंडियन्सची टीम चुकीच्या कारणांमुळे चर्चेत होती. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये कॅप्टनशिपचा कथित वाद असल्याच बोलल जातं. त्याशिवाय स्टेडियममध्ये टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्याच होणार ट्रोलिंग यामुळे मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत असते. पण पहिल्या विजयामुळे आता या चर्चा मागे पडतील. मुंबई इंडियन्सच्या या विजयाचा हिरो रोमारिओ शेपहर्ड ठरला. पण रोहित शर्मापासून सर्वांनीच टीमच्या विजयात योगदान दिलं.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

मुंबई इंडियन्सचे काल पहिली बॅटिंग करताना 5 बाद 234 धावांचा डोंगर उभारला. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 205 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईकडून रोहित शर्मा (49), इशान किशन (42), कॅप्टन हार्दिक पांड्या (39), टिम डेविड (45) आणि रोमारिओ शेपहर्ड (39) यांनी दमदार फलंदाजी केली. शेवटच्या हाणामारीच्या ओव्हर्समध्ये रोमारिओ शेपहर्डने जी फटकेबाजी केली, त्यामुळे मुंबई इंडियन्सला मोठी झेप घेता आली.

रोहित शर्माने काय म्हटलय?

मुंबई इंडियन्सच्या या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने X वर टि्वट केलय. रोहितने फक्त तीन शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ऑफ द मार्क’ एवढच रोहितने म्हटलय. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे आनंदी मुद्रेमधले फोटो देखील त्याने शेअर केलेत. पण या संपूर्ण टि्वटमध्ये कुठेच हार्दिक पांड्याचा उल्लेख केलेला नाहीय. रोहित शर्माने पाचवेळा मुंबई इंडियन्सला आयपीएल चॅम्पियन बनवल. पण यंदाच्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहितला हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याची कॅप्टनशिपपदी नियुक्ती केली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!