चंद्रपुरात घुमणार पंतप्रधान मोदींचा आवाज; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचाराचा आज फुटणार नारळ!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज चंद्रपुरात होत आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात येणार आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास मोदी चंद्रपुरात येतील. त्यानंतर त्यांची सभा होईल. विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि इतर नेते उपस्थित राहतील. दरम्यान चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

विशेष म्हणजे चंद्रपुरात तब्बल दहा वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. यावरुन आता वार- पलटवार सुरु झालेत. चंद्रपुरात मोदींनी चार सभा घ्याव्यात तरीही धानोरकरच निवडणूक येणार असं संजय राऊत म्हणालेत. त्यावर मुनंगटीवारांनी उत्तर दिलंय. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा नारळ चंद्रपूर मधून फोडत आहेत. राज्याची पहिली सभा वाघाच्या भूमीत होतं आहे त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. संजय राऊत यांना मुंबईत बसून, दिव्य दृष्टी येते. ते काहीही बोलू शकतात. मंत्रालयात न येता सरकार चालवणारे काय आव्हान देणार अशी टीका केली. लोक मोदीजींना मतदान करतील हा विश्वास आहे.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

कुठे होणार सभा?

चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींच्या सभेची तयारी केली जात आहे. दुपारी चार वाजता होणाऱ्या या सभेसाठी भाजपने युद्ध स्तरावर यंत्रणा राबविली आहे. हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अनुकूल करण्यात आला असून सुमारे एक लाख लोक या सभेला यावेत या दृष्टीने नियोजन सुरू आहे. आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भाजपचे समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या रणातील मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच जाहीर सभा संख्येच्या दृष्टीने परिणामकारक करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचाराता गुलाल उधळताना दिसत आहे. सभांचा धडाका आणि एकापेक्षा एक आश्वासन देत सर्व पक्षांकडून प्रचार सुरु आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार