चेन्नई-हैदराबादमध्ये काटें की टक्कर, कोण मिळवणार विजय?

0

सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे. चेपॉक मैदानावर सामना होणार आहे, येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते..

त्यामुळे आज फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळू शकतो. बेन स्टोक्स तंदुरस्त झाला असून आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.. दुखापतीमुळे मागील तीन सामन्यासाठी स्टोक्स उपलब्ध नव्हता… बुधवारी स्टोक्सने सराव सत्रात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज स्टोक्स उपलब्ध आहे. चेन्नईसाठी ही जमेची बाजू आहे. पण धोनीच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. डेवोन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीची दमदार कामगिरी आणि शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांचे आक्रमक रुप चेन्नईला मोठी धावसंख्या उभारून देत आहेत. पण इतर फलंदाजांकडून योगदान मिळत नाही.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सनरायजर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ते विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी सज्ज आहेत. हैदराबादच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत नाहीत. चेन्नईला घरच्या मैदानावर हरवायचे असल्यास हैदराबादच्या फलंदाजांना आपली कामगिरी चोख बजावावी लागेल. मागील सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी हराकिरी केली होती. पावरप्लेमध्ये विकेट फेकल्या होत्या. हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, कालसेन, मार्करम, अभिषेक शर्मा यांना योगदान द्यावे लागेल. सुंदर आणि समद यांन अखेरीस फिनिशिंग टच देण्याची गरज आहे. हैदराबदच्या फलंदाजीत सातत्याची कमी दिसत आहे. आजचा सामन्यात बाजी मारायची असल्यास सांघिक कामगिरी गरजेची आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई आणि हैदराबाद (KKR) यांच्यात आज २१ एप्रिल रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोइन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसंदा मगाला, शिवम दुबे, ड्वेन प्रीटोरियस, अहय मंडल, निशांत सिंधु, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सेंटनर, सुभांशु सेनापती, सिमरजीत सिंह, मथीसा पथिराना, महेश तीक्ष्णा, भगत वर्मा, प्रशांत सोलंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सनरायजर्स हैदराबाद: एडेन मार्कराम (कर्णधार), अब्दुल समद, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को यानसन, वाशिंगटन सुंदर, फजलहक फारूकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन , आदिल राशिद, मयंक मारकंडे, विवरांत शर्मा, समर्थ व्यास, संवीर सिंह, उपेंद्र यादव, मयंक डागर, नीतीश कुमार रेड्डी, अकील होसीन, अनमोलप्रीत सिंह