मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने कोथरूड, कर्वेनगर भागातील पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, आणि कर्वेनगर ते डेक्कन भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि शिवसूत्र यशस्वी जीवनाचा महामंत्र हे शिवचरित्र भेट देण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते.
गेल्या ४ वर्षापासून शिवाजी महाराज जयंती नाचून नाही वाचुन साजरी करावी हि संकल्पना आली कारण
*शिवाजी म्हणजे*
*शि म्हणजे शिका*
*वा म्हणजे वाचा*
*जी म्हणजे जिंका*
म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही हि पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत.आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे.म्हनुन त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे.शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे भविष्यात विद्यार्थी शिवचरित्राचं वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाही असं वाटतं
हे शिवचरित्र माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे आणि भारतीय इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साह्यक आयुक्त वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय विजय नायकल साहेब मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, स्वाती दारवटकर, पौर्णिमा केसवड, अनिल आठवले, अथर्व भरम, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते .
शिक्षकांना हा उपक्रम खूप आवडला ते म्हणाले मोरया मित्र मंडळाचा खूप छान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असेच उपक्रम भविष्यात सर्व मंडळांनी राबविले पाहिजेत .