देवेंद्रजींनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला: लोहगावशी तुकोबाराय यांचे जिव्हाळ्याचे नाते: मुरलीधरजी मोहोळ

0

विमानतळाच्या नामकरणासंदर्भातील पहिले पाऊल पडले असून आमच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव आता पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्येच मंजूर केला जाईल, या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. देवेंद्रजींनी शब्द पाळत घोषणा केल्यानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

या संदर्भातील प्रस्तार सादर करताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून चर्चा केली होती. आपल्या प्रस्तावानंतर काहीच दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला असून त्याबद्दल तिन्ही नेतृत्वाचे मनस्वी अभिनंदन आणि धन्यवाद !

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचे आजोळ होते. शिवाय तुकाराम महाराजांचे बालपण लोहगावमध्ये गेल्याने लोहगाव आणि तुकोबाराय यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे गावकरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता. शिवाय वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माच्या प्रचार, प्रसारात तुकोबारायांनी मोठे योगदान देत समाजाला नवा विचार दिला, जो आजही काल सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबारायांचे नाव पुण्याच्या आंतराष्ट्रीय विमामतळाला देणे, हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे.

आता राज्य सरकारने मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल आणि यासाठी या विषयाचा पाठपुरावा करणार आहे. मला विश्वास आहे, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?