मला केंद्रात मंत्रिपदाची संधी होती, तेव्हा नकार दिला, उपमुख्यमंत्रिपदावर श्रीकांत यांचं मोठं भाष्य

0

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद मिळणार अशा चर्चांनी गेल्या दोन दिवसांपासून जोर धरला होता. यावर एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चा पत्रकारच करतात, असं म्हणत फेटाळून लावले होते. आता श्रीकांत शिंदे यांनी देखील एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी पोस्ट करत सांगितले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती- श्रीकांत शिंदे

लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

श्रीकांत शिंदे यांची संपूर्ण पोस्ट-

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे…

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्रिपद श्रीकांत शिंदेंना मिळणार अशा चर्चा आपण पत्रकारच चर्चा करत असता. या सर्व चर्चा आहेत. एक बैठक अमित शाह यांच्यासोबत झाली आहे. दुसरी बैठक आमची तिघांची (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) होईल. त्यामधून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द-

एकनाथ शिंदे दरे या गावातून कालच ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. परंतु ही बैठक पुन्हा रद्द करण्यात आली आहे. तसेच आजच्या इतर सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज सर्व बैठका रद्द करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आज एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानीच असणार आहे.