बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय सिने-दिग्दर्शक नितेश तिवारी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. ‘रामायण’ या सिनेमात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे.
‘रामायण’ या सिनेमासंदर्भात आतापर्यंत अनेक अपडेट्स समोर आल्या आहेत. सिनेमाच्या स्टारकास्टसंदर्भात अनेक गोष्टी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी या सिनेमातून अभिनेत्री साई पल्लवीला (Sai Pallavi) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समोर आलं होतं. पण नंतर ती या सिनेमाचा भाग असल्याचं समोर आलं. ‘रामायण’ सिनेमात सीता ते हनुमानपर्यंत कोण कोणती भूमिका साकारणार हे समोर आलं आहे. अशातच आता लक्ष्मणाची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे.
‘हा’ अभिनेता झळकणार लक्ष्मणाच्या भूमिकेत!
रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता या सिनेमातील नव्या कलाकाराच्या एन्ट्रीबाबत माहिती समोर आली आहे. सीता माता आणि भगवान हनुमानानंतर लक्ष्मणाच्या भूमिकेबद्दल खुलासा करण्यात आला आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी बॉलिवूड नव्हे तर एका टीव्ही स्टारला कास्ट करण्यात आलं आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ‘जमाई राजा’ फेम रवी दुबे याची सिनेमात एन्ट्री झाली आहे. रवी दुबे ‘रामायण’ या सिनेमात लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. निर्माते लवकरच याबद्दल चाहत्यांना माहिती देतील.
‘रामायण’मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार
‘रामायण’ या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. साई पल्लवी, सनी देओल, बॉबी देओल, विजय सेतुपती या कलाकारांचीदेखील सिनेमात एन्ट्री झाली आहे. आता रवी दुबेची एन्ट्री झाल्याचं समोर आलं आहे. तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
‘रामायण’च्या शूटिंगला सुरुवात
‘रामायण’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा सिनेमा खूपच भव्यदिव्य असणार आहे. हॉलिवूड सीरिज ‘लॉर्ड ऑफ रिंग्स’चा टेक्निकल क्रू या सिनेमासाठी काम करत आहे. ‘रामायण’ सिनेमासाठी साई पल्लवीआधी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला विचारणा झाली होती. पण काही कारणाने तिने हा सिनेमा नाकारला.