पावसाळी ट्रेकसाठी ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’ने जारी केल्या सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचना

0

राज्यात पावसाळा जोमात सुरू असतानाच सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवळीनं बहरल्या आहेत. त्यामुळे कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील गड-किल्ले, धबधबे आणि जंगल वॉक्ससाठी पर्यटक व ट्रेकर्स मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. मात्र, याच पार्श्वभूमीवर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ (AMGM) ने पावसाळी ट्रेकच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

१६ जूनपर्यंत भारत हवामान विभागानुसार (IMD) राज्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक भागात मान्सूनने प्रवेश केला आहे. पावसाळ्याचा आनंद घेताना डोंगराळ भागात ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढतं आहे.

पावसाळी ट्रेकमध्ये वाढणारे धोके :

  • निसरड्या वाटा
  • भरून वाहणारे ओढे
  • दाट धुके
  • धबधब्यांजवळ ‘सेल्फी’ घेण्याची धोकादायक सवय
  • अनोळखी व एकांगी भागात जाणं
अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या घटनांमुळे दरवर्षी अनेक गंभीर दुखापती व मृत्यू घडत असतात. अनेक वेळा गिर्यारोहण संस्था आणि बचाव पथकांना अपघातग्रस्त पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रचंड जोखमीचा सामना करावा लागतो. गार्डियन गिरीप्रेमी इंस्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग आणि महाराष्ट्र माउंटेनिअर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर यांचे पथक नेहमीच तत्परतेने कार्यरत असते.

AMGM कडून महत्त्वाच्या सूचना :
AMGM चे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सर्व ट्रेकप्रेमींना आवाहन केले की, “प्रत्येकाने जबाबदारीने आणि सुरक्षित पद्धतीने ट्रेकिंगचा आनंद घ्यावा. अनावश्यक धोकादायक कृती टाळाव्यात.”

त्यांनी पुढील सूचना दिल्या आहेत :

  • अनुभवी गटांसोबतच ट्रेक करा
  • पूर्व तयारी पूर्ण असावी – पहिल्या मदतीचे साहित्य, योग्य शूज, मोबाईल नेटवर्क बाबत माहिती
  • अनावश्यक ठिकाणी ‘सेल्फी’ घेणे टाळा
  • धोकादायक किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  • निसर्गात कचरा करू नये – ‘क्लीन ट्रेकिंग’चा आग्रह
  • फॉरेस्ट/स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

सह्याद्रीचे सौंदर्य अनुभवताना सुरक्षितता सर्वांत महत्त्वाची आहे, याकडे महासंघाने विशेष लक्ष वेधले आहे.