मनोहरलाल खट्टर समर्थक अलिप्त अन् नायबसिंग सैनी मंत्रिमंडळाचा विस्तार; JJPची 4.5वर्षाची जूनी युती तुटली

0

जननायक जनता पक्ष (JJP) सोबतची साडेचार वर्षे जुनी युती तोडून हरियाणाचे मुख्यमंत्री झालेले नायब सिंग सैनी यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. आता सैनी सरकारमध्ये 6 कॅबिनेट मंत्री आणि 7 राज्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. कमल गुप्ता यांनी कॅबिनेट मंत्री, सीमा त्रिखा, महिपाल धांडा, असीम गोयल, अभय सिंह यादव, सुभाष सुधा, विषंभर सिंग बाल्मिकी आणि संजय सिंह यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नायब सैनी यांनी 12 मार्च रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्यासोबत अन्य पाच मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये कंवरपाल गुजर, मूलचंद शर्मा, रणजित सिंग, जेपी दलाल, डॉ बनवारी लाल यांच्या नावांचा समावेश होता. हे सर्वजण पूर्वीच्या मनोहर लाल सरकारमध्ये मंत्रीही होते. हरियाणा मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 13 मंत्र्यांची संख्या असू शकते, जी आता पूर्ण झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

नायब सैनी मंत्रिमंडळात डॉ. कमल गुप्ता वगळता उर्वरित सात जण पहिल्यांदा मंत्री झाले आहेत. कमल गुप्ता हे यापूर्वी हरियाणाचे यूएलबी मंत्री राहिले आहेत. गुरुग्राम आणि फरिदाबादलाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. डॉ कमल गुप्ता कॅबिनेट मंत्री झाल्या आहेत. यातच नायब सैनी सरकारमध्ये सहा कॅबिनेट मंत्री आणि सात राज्यमंत्री आहेत.

या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

डॉ. कमल गुप्ता, कॅबिनेट मंत्री

सीमा त्रिखा, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

महिपाल धांडा, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

असीम गोयल, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

अभयसिंह यादव, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

सुभाष सुधा, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

विश्वंभर सिंह बाल्मिकी, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

संजय सिंह, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

दरम्यान, मनोहर लाल खट्टर सरकारमध्ये गृहमंत्री असलेले अनिल विज यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. सैनी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात विज मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यालाही आले नव्हते. अनिल विज, ओमप्रकाश यादव, संदीप सिंग आणि कमलेश धांडा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.