राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची हाती: अधिकृत घोषणाही लवकरच

0
33

लोकसभा निवडणुकांसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी हाती लागली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या सोबत जाणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यासोबत अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय. बीड लोकसभा मतदारसंघातून विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांचं नाव चर्चेत असून वर्ध्यातून नितेश कराळे मास्तर यांच्या नावाचीही चर्चा रंगताना दिसतेय. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

बघा कोण आहेत शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार

रावेर                संतोष चौधरी

दिंडीरो               भास्कर भांगरे

शिरूर.               डॉ. अमोल कोल्हे

माढा                  धैर्यशील मोहिते पाटील

नगर दक्षिण           निलेश लंके

बीड                   ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे

वर्ध्यातून.             नितेश कराळे मास्तर

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

बारामती               सुप्रिया सुळे

सातारा                अखेरच्या क्षणी जाहीर होणारं (विद्यमान)

भिवंडी                  बाळामामा म्हात्रे