सुप्रसिद्ध ‘आवाज’ आता भाजपसोबत; अनुराधा पौडवाल यांनी घेतलं कमळ हाती

0

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दुपारी त्या भाजप कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची वाट धरली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. त्याआधी अनुराधा पौडवाल यांचा भाजपप्रवेश झाला आहे. पौडवाल भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवतील का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. पौडवाल या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांची गाणे आजही लोकांचा पसंतीस पडतात. त्यांची काही भक्तीगीते खूप लोकप्रिय आहेत..

कोण आहेत अनुराधा पौडवाल?
६९ वर्षीय अनुराधा पौडवाल या ९० दशकातील आपल्या भक्तीगीतांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचे लग्न १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्यासोबत झालं होतं. ते एसडी बर्मन यांचे असिस्टंट आणि म्यूझिक कंम्पोझर होते. त्यांना आदित्य नावाचा मुलगा आणि कविता नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालाय. १९९१ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा