बारामती पवारांचा सातबारा नाही, ६ लाख मतदार विरोधात असल्याचा दावा करत तिसरा खेळाडू रिंगणात

0
1

बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असल्याची चिन्ह गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. विद्यामान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. यामुळे बारामतीमध्ये नणंद भावजय लढाईची चर्चा सुरु होती. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे बारामतीमध्ये पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

विजय शिवतारे यांच्या तोंडी हर्षवर्धन पाटलांची भाषा

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात आरपारची लढाई लढण्याची घोषणा केली. आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावे. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही, असे वक्तव्य करत विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला.

कसा केला होता पराभव

राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन २०१९ च्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते. त्यांनी शिवतारे यांना चँलेज दिले. अजित पवार म्हणाले होते की, “तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा बारामती लोकसभा मतदार संघात काढणार असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

सासवडमधील तो अपमान जनतेचा

सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचा हल्ला विजय शिवतारे यांनी केला. बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असल्याचा दावा त्यांनी करत येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला. आता गुलामगिरी करणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. यामुळे येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे अशा लढाई होण्याची शक्यता आहे.