इन्फोसिस फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे.






इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्ष सुधा मूर्ती यांचे औद्योगिक जगतात मोठे नाव आहे. इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका अशी त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायण मूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या आहेत.











