राज्यातील डझनभर खासदारांची तिकिटे भाजप कापणार; सर्व्हेत ‘स्ट्राइक’रेट समाधानकारक नसल्याने मोठा निर्णय

0

भाजप नेतृत्वाकडून राज्यातील पक्षाच्या खासदारांचे अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. त्या सर्व्हेमध्ये डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे ज्यांचा स्ट्राइक रेट चांगला नाही, त्या खासदाराचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेत या खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचा रिपोर्ट आला आहे. ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगली नाही, त्यांचा उमेदवारीमध्ये पत्ता कट होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे भाजपच्या राज्यातील खासदारांची धाकधूक वाढली आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाकडून राज्यातील पक्षाच्या खासदारांचे (MP) अंतर्गत तीन सर्व्हे करण्यात आले आहेत. त्या सर्व्हेमध्ये डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ज्यांचा स्ट्राइक रेट चांगला नाही, त्या खासदाराचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील भाजप खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षांत कशी राहिली, हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कोणाचे नाव येणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. येत्या दोन दिवसांत भाजपची उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये डझनभर विद्यमान खासदारांची नावे नसण्याची दाट शक्यता आहे.

अधिक वाचा  अजितदादांची ही खेळी पुणेरी राजकारणात मोठी उलथापालथ; 3 पक्षात वादाचा भडका आणि भाजपाची ही गणिते बिघडली आत्ता दुरंगी लढती शक्य

या मतदारसंघातील उमेदवार बदलणार?

भाजपकडून बीड, धुळे, सोलापूर, सांगली, लातूर, जळगाव, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नांदेड, नगर, वर्धा, रावेर या मतदारसंघांची विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोणकोणत्या खासदारांचा स्ट्राईक रेट कमी?

१. बीड- प्रीतम मुंडे

२. धुळे- सुभाष भामरे

३. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी

४. सांगली- संजय काका पाटील

५. लातूर- सुधाकर श्रृंगारे

६. जळगाव- उन्मेष पाटील

७. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी

८. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

९. अहमदनगर- सुजय विखे पाटील

१०. नांदेड- प्रतापराव चिखलीकर

११. वर्धा- रामदास तडस

१२. रावेर- रक्षा खडसे

तिकीट कापण्याची ही आहेत कारणे

सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदारांबाबत असलेली नाराजी. निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे.