आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठी भेट दिली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे. पीएम मोदींनी ट्विट केले की, ‘आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल”.






महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी झाली आहे. पंतप्रधान मोदींनी आज सोशल मिडीयावर पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे.
राजधानीत गॅस सिलिंडर फक्त 603 रुपयांना मिळणार
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 2024-25 या वर्षातही प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना वर्षभरात 12 सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे परंतु योजनेअंतर्गत 603 रुपयांना सिलिंडर उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी रक्षाबंधानिमित्त दिली होती २०० रूपयांची सूट
यापूर्वी सरकारने रक्षाबंधनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरची (१४.२ किलो) किंमत २०० रुपयांनी कमी केली होती. पंतप्रधान मोदींनी ओणम आणि रक्षाबंधन या सणांना भाव कमी करून भगिनींना मोठी भेट दिली आहे. याचा फायदा देशातील 33 कोटी ग्राहकांना होणार आहे.












