लोकनेते गोपीनाथ मुंडे हॉल व श्रीमती सुमनताई माथवड भाजी मार्केट इमारत सुरू ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवारची मागणी

0
1

पुण्यातील कोथरूड येथे असलेल्या सुतार दवाखाण्याजवळ मोठी वर्दळ असते. अनेक भाजी व फळ विक्रेते येथे रस्त्यावर आपला माल विकत असतात. अशातच येथे होणारी गर्दी लक्षात घेता शासनाने एक अधिकृत इमारत बांधून त्यात मंडई चालू करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. त्याचं अनुषंगाने टॅक्स भरणाऱ्यांचे अनेक पैसे खर्च करून ही इमारत बांधण्यात ही आली परंतु उद्घाटनाच्या अभावी सदर इमारतीचा वापर केला जात नाही. तिचे नामकरण लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माठवड भाजी मार्केट असे करण्यात आले.

परंतु अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ही इमारत तिचे उद्देश साधण्याच्या प्रतीक्षेत आहे. मोकळी इमारत ही वाया गेलेला लोकांचा निधी व वेळ दर्शवते. तरी प्रशासनास विनंती की लौकरात लवकर ठोस पाऊले उचलून या इमारतीला कामी आणावे व लोकांच्या सेवे साठी भाजी मार्केट खुले करावे. सध्या प्रभाग 12 नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीने त्रस्त असून ती इमारत वापरावींना पडल्यामुळे रस्त्यावरती बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांनाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या वतीने योग्य पाऊले अशी मागणी गिरीश गुरनानी अध्यक्ष कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांनी केली आहे.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली