अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाललैंगिक अत्याचार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा

0
1

बारामती – बाललैंगिक अत्याचार प्रकरणी प्रकाश किसन अडागळे (रा. पारगाव, ता. दौंड) यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश जे.ए. शेख यांनी वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

सहा वर्षांची अल्पवयीन चिमुरडी 23 मार्च 2021 रोजी पारगाव (सालुमालू) येथील किराणा दुकानात मेंदीची पुडी आणण्यासाठी गेली असताना प्रकाश अडागळे याने तिला स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. पिडीतीचे आईने या बाबत फिर्याद दिली होती.

यवतचे उपनिरिक्षक एस.ए. नागरगोजे यांनी तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले. सरकारपक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील सुनिल ईश्वर वसेकर यांनी नऊ साक्षीदार तपासले. फिर्यादीने न्यायालयात साक्ष दिली.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

पिडीता अवघी सहा वर्षांची असूनही तिने न्यायालयात झालेली घटना सविस्तर विशद केली. मुलीच्या वयाबाबत पुरावा नसल्याने डॉक्टरांची साक्ष घेण्यात आली. या साक्षी निकालात महत्वाच्या ठरल्या.

वसेकर यांचा युक्तीवाद, साक्षी व वैदयकीय पुरावा ग्राह्य धरुन न्यायालयाने प्रकाश अडागळे याला वीस वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सदर पिडीतेस मनोधैर्य योजनेअंतर्गत तीस दिवसात नुकसान भरपाई देण्याचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांना न्यायालयाने आदेश दिला. कोर्ट अंमलदार पोलिस नाईक संतोष ढोपरे, सहायक फौजदार नामदेव नलवडे, वर्षा सुथार यांनी या खटल्यात सहकार्य केले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा