त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ 12 नोव्हेंबर 2021 रोजी रजा अकादमी इस्लामिक फेडरेशन संघटनेतर्फे अमरावती येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यातील लोकं आक्रमक झाले. मोर्चेकरांनी दुकानांची तोडफोड केली. या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी भाजपा आणि हिंदू संघटनांनी अमरावती शहर बंद केले. यानिमित्त काढण्यात आलेल्या मोर्च्यात अमरावतीतील राजकमल चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. शहराचे भाजपा नेते आमदार प्रवीण पोटे, खासदार अनिल बोंडे, भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, माजी आमदरा जगदीश गुप्ता यांनी मोर्च्याला मार्गदर्शन केले.
पोलिसांना करावा लागला होता लाठीचार्ज
बंदच्या आवाहनानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दगडफेक झाली. भाजपच्या आंदोलनाला हिसंक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सहा वेळा लाठीचार्ज करावा लागला. यात भाजप नेत्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण पोहचले. न्यायालयाने दोनच वर्षात या प्रकरणाचा निकाल लावला. सर्व भाजप नेत्यांसह ३० जणांची निर्दोष मुक्तता केली.