महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान करून विरोधकांच्या निशाण्यावर आलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर आता तिचे प्रकाश आंबेडकरही भडकले आहेत. याआधी नको ते बोलणाऱ्या भिडेंवर कारवाई झाली असती तर ही भिडे आता महात्मा गांधींवर बोललेच नसेत, असे सांगून आंबेडकरांनी एकप्रकार सरकारलाच सुनावले आहे.






महात्मा गांधीबाबत आक्षेपार्ह बोलून भिडेंनी नवा वाद ओढवून घेतला आहे. भिडेच्या वादाचे पडसाद उमटून काही राजकीय पक्षांसह संघटनाही रस्त्यावर उतरल्या आहेत. त्याचवेळी या प्रकरणात काँग्रेसच्या काही नेत्यांना धमक्या दिल्या गेल्या आहे.
हा वाद, धमक्या आणि परिणामांच्या पाश्र्वभूमीवर आंबेडकरांनी माध्यमांपुढे येऊन आपली भूमिका मांडली. तेव्हा त्यांनी भिडे यांचा समाचार घेतलाच, पण अशा प्रकरणांत भिडेंना पाठीशी घालून सरकार अप्रत्यक्षपणे ‘बळ’च दिले असल्याचा रोख आंबेडकरांनी ठेवला.
“संभाजी भिडे यांच्याशी भाजपचा संबध नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत असले तरी भाजपच्या किती संघटना हे मी सांगतो. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (RSS) धार्मिक वादाचा अजेंडा आहे. तो त्यांनी थांबवावा आणि देशाच्या विकासाकडे लक्ष द्यावं,” असे त्यांनी सांगितले.











