काँग्रेस भिडे गुरुजींच्या वक्तव्याने आक्रमक; पुणे सांगली, अमरावती, नगरमध्ये काँग्रेसकडून निदर्शने

0

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत. भिडे गुरुजींनी महात्मा गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे सांगली, अमरावती, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. अमरावतीमध्ये यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आंदोलन केले. तर सांगतील पुरोगामी पक्ष आणि संघटनेसोबत काँग्रेसने देखील भिडे गुरुजींच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तसेच काँग्रसेकडून आता भिडे गुरुजींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

पुण्यात संभाजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी
पुण्यात देखील काँग्रसेच्या वतीने भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व चौकाजवळ काँग्रेसने आंदोलन केले. दरम्यान काँग्रेसच्या या आंदोलनात आमदार विश्वजीत कदम देखील सहभागी झाले. तर यावेळी संभाजी भिडे यांच्याविरोधात काँग्रेसकडून घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सांगलीत काँग्रेस आणि पुरोगामी संघटना आक्रमक
सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि पुरोगामी संघटना यांच्यावतीने संभाजी भिडे यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. सांगलीतील स्टेशन चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. तसेच महात्मा गांधीजीच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक देखील यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते यांसह जिल्ह्यातील अनेक पुरोगामी पक्ष आणि संघटना यांनी सहभाग घेतला.

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. तर संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मार आंदोनलन करण्यात आले आहे. तर यावर पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार का असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येत आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

अमरावतीमध्ये यशोमती ठाकुरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे यशोमती ठाकुर यांनी यांनी संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी अल्टिमेट दिला होता. मात्र तरीही त्यांना अटक न केल्याने काँग्रेस झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर र शेकडो कार्यकर्त्यांनी संभीजी भिडे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरात काँग्रसकडून आंदोलनं करण्यात येत असून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी देखील जोर धरत आहे. त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्यांवर कोणती कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार