भाजपची वेगळीच इच्छा…; मंत्रिमंडळ विस्ताराचा हा फॉर्म्युला ठरला! भाजप ‘या’ मंत्र्यांनाही नारळ?

0
1

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत बैठका होताहेत. 9 जणांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर त्यांना कोणती खाती द्यायची? मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा? या मुद्द्यावर अडलेला पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता काही महत्त्वाची माहिती समोर आलीये. यात भाजपकडून मंत्रिमंडळातील काही जणांना नारळ दिला जाणार असून, मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे.

अजित पवारांसह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण त्यांना अजूनही खाती दिली गेली नाहीत. आधी अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाल. त्यानंतर प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

एकनाथ शिंदेंच्या मनात काय?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतरच खातेवाटप केले जावे, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. सध्या मंत्रिमंडळ 14 जागा रिक्त असून, उर्वरित मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर एकदाच खातेवाटप केले जावे, असे शिंदेंच्या मनात आहे. अजित पवारांच्या गटाकडून काही महत्त्वाची खाती मागण्यात आली आहे. ही खाते देण्याला एकनाथ शिंदे यांचा विरोध नसल्याचेही सुत्रांनी सांगितले. त्याचबरोबर शिंदेंच्या काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, अशी चर्चा केली जात होती. मात्र शिवसेनेकडून असं काहीही केले जाणार नसल्याचं सांगण्यात आले.

भाजपच्या मनात काय?
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी आग्रही असून, दुसरीकडे भाजपची भूमिका मात्र वेगळी आहे. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी भाजपची इच्छा आहे. भाजपकडून काही मंत्र्यांना वगळण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याबद्दल चर्चा सुरू आहे. मात्र, यामुळे भाजपत असंतोष वाढण्याचीही शक्यता आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

मंत्रिपदासाठी लॉबिंग
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. पक्षातील इतर अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याकडून मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिंदेंवर दबावतंत्राचा वापर केला जात आहे. यातील बहुतांश आमदार मुंबई येऊन मंत्रिपदासाठी लॉबिंग करण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी फॉर्म्युला
मंत्रिमंडळातील 14 जागा रिक्त आहेत. यासाठी विस्तार प्रलंबित असून, 14 पैकी अजित पवार गटातील चौघांची वर्णी लागणार आहे. तर उर्वरित 10 जागांचे समान वाटप केले जाणार आहे. म्हणजे शिवसेना आणि भाजपच्या वाट्याला प्रत्येकी 5 मंत्रिपदं वाट्याला येतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे