मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या आरोपांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. यावेळी पवारांनी एका मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली आहे. माध्यमांशी बोलतांना सुरुवातीला शरद पवार यांनी राज्यातील महिला अत्याचाराचं विदारक वास्तव समोर मांडलं. पवार बोलतांना म्हणाले की, महिला आणि मुलींवर हल्ले, या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
पुणे, ठाणे, मुंबई आणि सोलापूर या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मुली आणि महिलांवर हल्ले वाढले आहेत. २३ जानेवारी ते २३ मे या कालावमधीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली बेपत्ता झालेल्या आहेत. पुण्यातून ९२३ मुली बेपत्ता आहेत. ठाण्यातून ७२१ बेपत्ता, मुंबई ७३८, अशा मिळून २४५८ मुली बेपत्ता झालेल्या आहेत. 1४ जिल्ह्यात ४ हजार ४३१ मुली बेपत्ता झालेल्या आहेत. पुढे बोलतांना पवार म्हणाले की, आम्ही महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं. परंतु आम्ही महानगर पालिकांपर्यंतच ते देऊ शकलो. आज महिला चांगलं काम करत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर महिलांना राजकीय आरक्षण देण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यायला पाहिजे. त्यावर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि इतर विरोधी पक्षांशी बोलू, असं पवार म्हणाले.
काय म्हणाले शरद पवार?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला चांगलं काम करत आहे
त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय निर्णय राष्ट्रीय स्तरावर घ्यायला पाहिजे
आम्ही देऊ शकलो होतो ते महापालिकेपर्यंत देऊ शकलो
विधिमंडळ आणि संसद या दोन ठिकाणी आरक्षण द्यावं
मोदी याच्यात पुढाकार घेत असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ
अन्य पक्षांशी चर्चा करुन त्यांनाही याच्यात सहभागी करुन घेता येईल v