‘मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा…’; आश्विनने सांगितला पाकिस्तानविरुद्धचा किस्सा

0

भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटल्यावर अंगावर काटा येणारच. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही संघामध्ये फक्त आयसीसीच्या स्पर्धेत भिडत पहायला मिळते. मागील दोन्ही आयसीसीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं होतं. सर्वात चिवट सामना झाला तो टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सामना. भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला होता. अखेरच्या 2 बॉलवर 2 धावांची गरज असताना आश्विनच्या स्मार्ट खेळीमुळे सामना भारताच्या पारड्यात गेला. त्या सामन्यात कोहलीने विराट खेळी करत सर्वांचं मन जिंकलं होतं. त्यावर आता आश्विनने मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला आर आश्विन?
पाकिस्तान विरुद्धच्या सामना खेळवला जात होता. त्यावेळी वर्ल्ड कपचा सामना खेळतोय, याची आम्हाला जाणीव होती. पाकिस्तानविरुद्ध शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानात आलो. तेव्हा विराट कोहली मैदानात होता. त्याचा जम बसला होता, तेव्हा कोहली कोहलीने मला 1 चेंडू खेळण्यासाठी जवळपास 7 पर्याय मला दिले होते. जेव्हा मी विराटच्या डोळ्यात पाहिलं, तेव्हा मला विजय दिसत होता. मला एवढं खेळता आलं असतं तर मी नंबर 8 वर खेळत असलो नसतो. मला असं वाटत होतं की विराट दुसऱ्या ग्रहावरून आला आहे. मात्र, मी पृथ्वीवर परत आलो, असं आश्विन म्हणाला आहे. विराट कोहलीने या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. हा एक सर्वोत्तम सामना होता, असंही आश्विन म्हणतो.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

नेमकं काय झालं होतं?
भारताला विजयासाठी शेवटच्या 1 चेंडूवर 2 धावांची गरज होती. दिनशे कार्तिक 19 व्या ओव्हरच्या 5 व्या बॉलवर बाद झाला. त्यावेळी आश्विन मैदानावर आला आणि विराटला नॉन स्टाईकला थांबावं लागलं. आश्विन हा नवखा खेळाडू असल्याने अखेरच्या बॉलवर त्याला 2 धावा घेता येईल का? असा सवाल सर्वांच्या मनात होता. विराट कोहली त्यावेळी 53 बॉलवर 82 धावा करून मैदानात उभा होता. स्टाईक विराटकडं असती तर गोष्ट वेगळी होती. मात्र आश्विनच्या खांद्यावर टीम इंडियाचा विजय होता. मोहम्मद नवाझ गोलंदाजी करत असताना त्याने एक चूक केली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

दरम्यान, नवाझने शेवटच्या बॉल यॉर्कर करण्याच्या नादात वाईड टाकला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी 1 बॉलवर 1 धावाची गरज होती. त्यावेळी लॉग ऑनच्या दिशेने बॉल टोलवत आश्विनने विजय साजरा केला. पाकिस्तानवर धमाकेदार विजय मिळवत भारताने 2021 मधील हिशेब चुकता केला होता. त्यामुळे संपूर्ण भारतात आनंद व्यक्त केला गेला आणि भारतात दिवाळी साजरी करण्यात आली.