पाकिस्तानी एजंटला गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे सध्या अटकेत आहेत. पुण्यातील विशेष न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली होती. पुण्यातील डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या प्रयोगशाळेचे संचालक कुरुलकर यांना महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३ मे रोजी अटक केली होती.
दरम्यान चौकशीदरम्यान डीआरडीओकडून मोठी चूक झाली आहे. DRDO ने एटीएसला चुकीच्या माणसाचा लॅपटॉप तपासासाठी दिला. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचा लॅपटॉप तपासणीसाठी मागितला होता. तर DRDO ने कुरुलकर यांचा लॅपटॉप देण्याऐवजी चुकीच्या माणसाचा लॅपटॉप दिला. DRDO ची ही चूक एटीएसने लक्षात आणून दिली
पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर यांना चार मे रोजी अटक करण्यात आली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांची कोठडी २५ जूनला संपल्याने सोमवारी न्यायालयात सुनावणी होती.
दरम्यान, तपासात कुरुलकरांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांची पॉलीग्राफ चाचणी आणि व्हाइस लेअर अँड ॲनॅलिसिस चाचणी करण्याची मागणी एटीएस न्यायालयाकडे केली. न्यायालयाने एटीएसला कुरुलकर प्रकरणात पॉलिग्राफ आणि व्हाइस लेअर ॲनॅलिसिस चाचणीतील फरक स्पष्ट करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यावर पुढील सुनावणी ३० जूनला होणार आहे.