… पुन्हा मित्रांसाठी तरुणांच्या आशा पायदळी; राहुल गांधी यांनी ‘ट्विटर’द्वारे जाहीर केली यादीच

0
1

आपल्या भांडवलदार मित्रांच्या फायद्यासाठी दोन लाख तरुणांचा रोजगार केंद्र सरकारने हिरावून घेतला आहे, तरुणांच्या आशा पायदळी तुडविल्या जात आहेत,’’ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केला. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या या भारताच्या गौरवाची बाब होत्या. बेरोजगार असलेल्या प्रत्येक तरुणाचे अशा कंपन्यांमध्ये काम करण्याचे स्वप्न असायचे. आता मात्र या कंपन्या सरकारच्या प्राधान्यक्रमात नाहीत,’’ अशी टीका राहुल गांधी यांनी ‘ट्विटर’द्वारे केली आहे.

राहुल गांधी यांनी केंद्रसरकारच्या धोरणांवर ‘ट्विट’द्वारे हल्ला चढविला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या २०१४मध्ये १६.९ लाख एवढी होती. ती कमी होऊन २०२२मध्ये १४.६ लाख एवढी झाली आहे. नोकऱ्यांची संख्या कमी होणे हे प्रगतीचे लक्षण आहे का? दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात दोन लाख जणांचा रोजगार सरकारने हिरावून घेतला आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

एकीकडे नोकऱ्या कमी करत असताना दुसरीकडे कंत्राटी कामगारांची संख्यामात्र दुप्पट केली आहे. ही कृती म्हणजे घटनेने दिलेले आरक्षण संपविण्याचा प्रयत्न आहे.’’ असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी जाहीर केलेली यादी

बीएसएनएल १,८१,१२७

स्टील ॲथॉरिटी इंडिया लिमिटेड ६१,९२८

एमटीएनएल ३४,९९७

एसईसीएल २९,१४०

एफसीआय २८,०६३

ओएनजीसी २१,१२०