‘केसीआर’ ना भेटलो पण अजून BRS प्रवेश नाही यानंतरच निर्णय, भालकेंची भूमिका संशयीच

वडिलांनंतर मुलालाही मुख्यमंत्र्यांचे विमान; भारत भालकेंसाठीही चव्हाणांनी ‘प्लेन’ पाठविलेले

0
1

तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, मी अजूनही भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केलेला नाही. महाराष्ट्रात आल्यानंतर मी भालके यांना मानणारे पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आणि विठ्ठल परिवारातील नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी आमचे (राष्ट्रवादी काँग्रेस) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेऊन चर्चा करणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी सांगितले. भालके यांच्यासाठी विमान पाठविण्याची ही पहिलीच घटना आहे, असे नाही. यापूर्वीही २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार भारत भालके यांच्यासाठीही तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष विमान पाठविले होते.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे काल सकाळी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पाठविलेल्या विशेष विमानातून पुण्याहून तेलंगणाला गेले होते. ते विमान खरं तर सोलापूरच्या विमानतळावर येणार होते. मात्र, चिमणीच्या अडथळ्यामुळे त्याला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे भालके यांना पुण्याला जावे लागले. त्यामुळे त्यांचा दौरा लांबला होता.

भालके हे आपल्या कुटुंबासोबत हैदराबादला गेले होते. भालके यांना केसीआरपर्यंत पोचविण्यात बीआरएसचे मराठवाड्यात प्रमुख नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी महत्वाची भूमिका निभावली. भालके यांना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुख्यमंत्री केसीआर यांची भेट मिळाली. त्या भेटीत तेलंगणातील शासकीय योजनासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती भालके यांनी दिली असली तरी ते पंढरपूरचे बीआरएसचे उमेदवार आहेत, अशी माहिती आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

त्या भेटीसंदर्भात भालके म्हणाले की, मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी आम्ही बुधवारी सायंकाळी भेट झाली. त्या भेटीत त्यांनी तेलंगण सरकार शेतकऱ्यांविषयी राबवत असलेल्या योजनांसदर्भात माहिती दिली आहे. मी अजूनही बीआरएसमध्ये प्रवेश केलेला नाही. त्याबाबतचा निर्णय पंढरपूर आल्यानंतर प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून घेणार आहे. विठ्ठल परिवारातील नेत्यांशी याबाबत मी बोलणार आहे. महाराष्ट्रात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेणार आहे. त्यांना या भेटीसंदर्भात माहिती देऊन चर्चा करणार आहे, त्यामुळे भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात सर्वांशी चर्चाविनिमय केल्यानंतरच ठरविणार आहे, असेही भगीरथ भालके यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार