भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने तीन गडी गमावून 327 धावा केल्या आहेत. सध्या ट्रॅव्हिस हेड 156 चेंडूत 146 आणि स्टीव्ह स्मिथ 227 चेंडूत 95 धावांवर नाबाद आहे.
पहिल्या दिवशी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेवर मैदानावर केलेल्या कृतीमुळे गंभीर आरोप केले जात आहेत. अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे क्रिकेट विश्वात अचानक खळबळ उडाली आहे.
आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अजिंक्य रहाणेने 17 महिन्यांनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेने मैदानावर क्षेत्ररक्षण करताना असे काही केले, ज्यामुळे त्याच्यावर ICC नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अजिंक्य रहाणेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आपल्या दोन्ही हातांवर थुंकताना दिसत आहे. अजिंक्य रहाणे हातावर थुंकल्यानंतर चेंडू उचलत असेल, तर आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन होईल, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
यावरून सोशल मीडियावर अजिंक्य रहाणेवर टीका होत आहे. आयसीसीने असा नियम केला आहे की, थुंकीने चेंडू चमकवण्यावर पूर्ण बंदी आहे आणि सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू असे करताना पकडला गेला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या नियमानुसार अजिंक्य रहाणे दोषी नसून ज्यांना नियमांची माहिती नाही ते अजिंक्य रहाणेवर टीका करत आहेत.