आयसीसीने पुरुषांच्या टी20 संघाची घोषणा केली आहे. 2024 या वर्षात चमकदार कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची या संघात निवड केली आह. यात टी20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. यासह भारताच्या तीन खेळाडूंना या संघात स्थान मिळालेलं आहे. या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळाली आहे. आयसीसीने निवडलेल्या संघात एकूण चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका या देशाच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड झाली आहे. आयसीसीने 2024 या वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची संघात निवड केली. भारताने मागच्या वर्षी टी20 फॉर्मेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. एकही सामना न गमवता जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे आयसीसीने निवडलेल्या संघात सर्वाधिक भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्माने 2024 मध्ये 11 सामन्यात 42 च्या सरासरीने 160 च्या स्ट्राईक रेटने 378 धावा केल्या होत्या. तर हार्दिकने 17 सामन्यात 352 धाव आणि 16 विकेट घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराहने 8 सामन्यात 8.25 च्या सरासरीने 15 विकेट, तर अर्शदीप सिंगने 18 सामन्यात 36 गडी बाद केले होते. आयसीसीने ओपनिंगसाठी रोहित शर्मा आणि ट्रेव्हिस हेड ही जोडी ठरवली आहे. हेडने 2024 या वर्षी खेळलेल्या 15 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 38.50 च्या सरासरीने आणि 178 च्या स्ट्राईक रेटने 539 धावा केल्या होत्या. यात चार अर्धशतकांचा समावेश होता. दुसरीकडे, इंग्लंडचा फिल सॉल्ट आणि पाकिस्तानच्या बाबर आझम यांना संघात फलंदाज म्हणून निवडलं आहे.
फिल सॉल्टने 17 टी20 सामन्यात 467 धावा केल्या आहेत. तर बाबर आझमने 23 सामन्यात 738 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला विकेटकीपर म्हणून संघात संधी मिळाली आहे. त्याने 2024 या वर्षात 21 सामन्यात 464 धावा केल्या. सिंकदर रझाची फिरकीपटू आणि अष्टपैलू म्हणून संघात निवड केली आहे. तर अफगाणिस्तानचा टी20 संघाचा कर्णधार राशीद खानली संधी मिळाली आहे. तर त्याच्या सोबतीला दुसरा फिरकीपटू म्हणून श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाला स्थान मिळालं आहे.