अभिनेत्री कॅटरीना कैफ हिचा Kay Beauty मेकअप ब्रँड सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. विविध प्रॉडक्ट्स ने हा ब्रँड सध्या अनेक जण वापरून बघत आहेत. Kay Beauty ब्रॅंड अंतर्गत काजळ, मायक्रोब्लेडिंग पेन आणि ब्रो टॅटू लाइनर लॉन्च केल आहे याची खास घोषणा तिने सोशल मीडिया वरून केली आहे.
सर्वाच्या त्वचेच्या सूट होतील अश्या प्रॉडक्ट्स चा यात समावेश आहे. मेकअप प्रॉडक्ट्स चा समावेश असलेला हा ब्रँड नक्कीच लोकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा ब्रँड #Eyedentitie तयार करण्यासाठी मदत करणार आहे. #MakeupThatKares हे ब्रँडच उद्दिष्ट आहे. या उत्पादनांमध्ये स्किनकेअर फायद्यांचा समावेश आहे. रंगीत मॅट काजल कॅमोमाइल आणि सिरॅमाइड्सने समृद्ध असतात, त्यांच्यात त्वचेला सुखदायक आणि शांत करणारे गुणधर्म असतात जे डोळ्यांची जळजळ कमी करतात. मायक्रोब्लेडिंग ब्रो पेन मध्ये व्हिटॅमिन ई आहे जे आर्द्रतेचे संरक्षण करते.लाइनरमध्ये व्हिटॅमिन बी 5 आहे जे केस आणि त्वचे साठी उत्तम आहे.
डोळे हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहेत डोळ्याची काळजी घेत त्यांना अजुन सुंदर दिसण्यासाठी गे प्रॉडक्ट्स नक्कीच मदत करू शकतात. आमचे प्रॉडक्ट्स हे वेगन आहेत आणि आधुनिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करणे सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत,” अस “
के ब्युटी ” ची सह-संस्थापक, कतरिना कैफ म्हणते !