राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार नाही, पण…; अजित पवारांची मोदी सरकारकडे रोखठोक मागणी

0

ओडिसामध्ये बालासोर येथे शुक्रवारी (२ जून) रात्री झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात २३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ९०० प्रवासी जखमी झाले आहेत. यानंतर देशातील राजकीय वर्तुळातून या अपघाताबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी स्वीकरात राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत मोठ्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्वीकारून पाच रेल्वेमंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. तशाच पध्दतीने या रेल्वेमंत्र्यांनी देखील जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.

राजीनामा दिल्याने प्रश्न सुटणार नाहीत हे मला माहिती आहे पण, तो दिल्याने खालच्या आधिकाऱ्यांची जबाबदारी वाढते. भारतात वेगवेगळ्या भागात बुलेट ट्रेन सुरू करण्याची भाषा केली जाते. त्याचं काम सुरू आहे. वंदे भारतच्या अनेक ट्रेन सुरू होत आहेत. काही ठिकाणी रेल्वे मार्गांचे खाजगीकरण देखील करण्यात आलं आहे. तो केंद्र सरकार आणि रेल्वेचा आधिकार आहे. पण हे करताना निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले यात त्यांचा काय दोष होता असे अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

अजित पवार पुढे म्हणाले की, सिग्नलकडे नीट पणे लक्ष दिलं गेलं नाही म्हणून हे घडलं. एवढी मोठी क्रांती झालीय. काही ठिकाणी कार आणि विमान चालवायला पण ड्रायव्हरची गरज नसते. असे बदल झाले असताना हे निष्पाप जीव गेले हे रेल्वे विभाग आणि सरकारचं अपयश आहे. याबद्दल ताबडतोब वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी. तसेच कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रयत्न न करता वस्तुस्थिती देशाच्या समोर आली पाहिजे अशी माझी मागणी आहे, असेही अजित पवार म्हणाले.