घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करताना पेट्रोल पंपाला आग, मृतांची संख्या वाढली

0
1

मुंबईतील घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली होती. ही घटना घडल्याच्या ४० तासांनंतर बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना पेट्रोल पंपाला आग लागली आहे. बुधवारी सकाळी आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप होती. परंतु दहा मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. दरम्यान घाटकोपर होर्डिंग्ज खालून आज सकाळी अजून चार मृतदेह ढिगाऱ्यातून काढले आहेत. त्यांची नावे अजून समजलेली नाहीत. यामुळे मृतांचा १८ वर जाण्याची शक्यता आहे. राजावाडी रुग्णालयातील प्रकाश वाणी यांनी ही माहिती दिली.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला आता ४० तास झाले आहेत. त्यानंतर मदत आणि बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकले आहेत. त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरु आहे. पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचावकार्यातील पथक काम करत आहे. परंतु बुधवारी सकाळी पेट्रोल पंपाला आग लागली. मोठे लोखंड कटरने कापात असताना आग लागली. आगीची घटना घडताच प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली. या ठिकाणी त्वरित अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्याचे काम सुरु आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

65 जवान, 20 मशीनद्वारे मलबा हटवण्याचे काम

आगीनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील लोकांनाही हटवण्यात आला आहे. पेट्रोल पंपाला लागलेल्या आगीमुळे ही काळजी घेण्यात आली आहे. सुदैवाने काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. 65 अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान, 20 मशीनद्वारे मलबा हटवण्यासाठी काम करत आहेत. मलब्याखाली दबलेल्या वाहनांना काढण्यात आले आहे. आणखी काही वाहने दबल्याचा अंदाज आहे. ते काढण्याच काम सुरु आहे. आतापर्यंत 89 जणांना रेस्कीयू करण्यात आले आहे.

पुणे मनपा अलर्ट मोडवर

मुंबईतील होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. पुणे शहरातील होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. ऑडिट न करणाऱ्या होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरात लवकर अहवाल महापालिकेला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यात १५०० अनधिकृत होर्डिंग्ज महापालिकेने हटवले आहेत.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले