2024च्या निवडणुकीत काय होणार? निकाल कसे असतील?; राहुल गांधींचा हा अंदाज काय?

0

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा चालणार का? की मोदींना सत्तेतून बाहेर पडावे लागणार याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारतातील लोकसभा निवडणुकीचे निकाल अत्यंत वेगळे असतील असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन येथे नॅशनल प्रेस क्लबमध्ये संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चांगली कामगिरी करेल असं मला वाटतं. लोकसभा निवडणुकीचे निकाल आश्चर्यकारक असतील. फक्त तुम्ही कॅलक्युलेट करा. आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊन भाजपला पराभूत करू, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. काँग्रेस विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधी पक्षांशी चर्चा सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

विरोधकांची महाआघाडी होईल
विरोधकांची एकजूट भक्कम आहे. आम्ही सर्व विरोधकांशी चर्चा करत आहोत. चांगलं काम सुरू आहे, असं मला वाटतं. काही गोष्टी कठिण आहेत. पण त्याही सुकर होतील. कारण अनेक राज्यात आणि काही पक्षांच्या स्पर्धक म्हणून काम करत आहोत. त्याच पक्षांना सोबत घेऊन लोकसभेची तयारी करायची आहे. मात्र, विरोधकांची महाआघाडी होईल याचा मला विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने संवैधानिक संस्थांवर बेकायदेशीररित्या कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला.

तेव्हा वाटलं नव्हतं…
राजकारणात आलो तेव्हा माझी खासदारकी काढून घेतली जाईल असं वाटलं नव्हतं. मात्र आता मला लोकांची सेवा करण्याची एक मोठी संधी मिळाली आहे. हा घटनाक्रम सहा महिन्यांपासून सुरू होता. आम्ही संघर्, करत होतो. सर्व विरोधी पक्ष भारतात संघर्ष करत आहे. संपूर्ण संपत्ती काही लोकांच्या हातात आहे. संस्थांवर ताबा मिळवला गेला आहे. आम्ही देशात लोकशाहीची लढाई लढण्यासाठी संघर्ष करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

मृत्यूच भय नाही
मी कुणाला घाबरत नाही. धोक्यांना घाबरत नाही. आयुष्यात धोके आहेत म्हणून मागे हटण्याचं कारण नाही. खूनांच्या धमक्यांमुळे मी चिंतीत नाही. मला मृत्यूचं भय वाटत नाही. प्रत्येकाला मरायचं आहे. माझ्या आजी आणि वडिलांकडून मी हेच शिकलोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.